सोमवार, २६ जानेवारी, २००९

आर्वतन

तुझ माझ नात चिरंतन टिकाव ,अशीच माझी इच्छां होती
तुझ्या जगात मात्र प्रतेक गोष्टीला एक्सपायरी डेट होती ..
तुला कस सांगू ,तुझ्यासाठी मी किती बेचैन होवून जगतोय ..
तुला निर्विकार बघून मात्र, आतल्या आत जळतोय
आता भावनांच्या लाटा मला स्वस्थ बसू देत नाहीत ,
ही अस्वस्तता, हे हरवन आता नित्याचच झालय...
माझ्यातल्या अनु -रेनुंना थोपवन, मला आता अशक्य झालय ...
विरह , दुरावा आणि अंत ...
या वेदना मी स्विकारल्याय...
मात्र माझ्या अंताआधी...
ऐशील ऐकदाच ,मला मुक्ति देन्यासाठी...
कारण,
आता मलाही तुज्याचसाठी संपायचय...
पुन्हा नविन जन्म घेण्यासाठी .....

रविवार, ११ जानेवारी, २००९

नो रिग्रेट्स - ५

मित्रहो, शेवटी 'नो रिग्रेट्स' ही रिग्रेट्स त्यागनारी भावना आहे जी आपल्याला एका स्टेबल व्यक्तित्वापर्यंन्त घेवून जाते । आणि रिग्रेट्स सुध्दा आपल्यात आमूलाग्र बदल घडवू शकते । आगदी पुराण कथेतील दरोडेखोर वाल्याकोळया प्रमाने..ज्याचा पुढे " महर्षि वाल्मिक ॠषि" झाले। मात्र हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की या रिग्रेट्सच्या नकारात्मक परिनामानाची आपल्याला बाधा न होता त्याचे सकारात्मक परिनामच आपल्या व्यक्तित्वाचा भाग होईल व जे खरया आर्थाने आपल्याला एका स्टेबल व्यक्तित्वापर्यंत घेवून जाईल । आपले आयुष्य जगत आसताना आपण आपल्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी घेतल्याने त्याचा होणार्या सर्व बरया आणि वाईट परिणामांची जबाबदारी घेतल्याने आपण निर्भय होतो , आणि खरया आर्थाने 'नो रिग्रेट्स ' ही स्थिति आपण आनुभवत आसतो ।

नो रिग्रेट्स -४

या सर्व रिग्रेट्सच्या भावनांतुंन बाहेर पडण्याचा ऊपाय नक्कीच आहे । तो म्हणजे योग्य 'कृति' ... जिचा निर्णय सर्वस्वी तूम्हीच घेतला आसेल, ज्या निर्णयाने होणार्र्या सर्व परिणामांची जबाबदारी स्विकारन्याचीआपली तयारी आसेल ... ही जबबदारीच तुम्हाला तुमची निर्णय क्षमता परत मिळवुन देइन । मग जरी तुम्ही आसा निर्णय घेतला आसेल ज्यामुळे इतराना बरे वाटणार आसेल मात्र तुम्ही त्याची जबाबदारी घेतल्याने त्याच्या सर्व बरे आणि वाईट परिनामांना सामोरे जाण्याची आपली आपसुकच मानसिकता होते। मग हा निर्णय योग्य आहे का अयोग्य हे कसे ठरवावे ? खुप सोप्प आहे । जो निर्णय आपण घेणार आसतो त्याची सर्वात प्रथम प्रतिक्रिया ही आपले मनच आपल्याला देत आसते। मात्र यात कधी कधी होकर किवा नकार या दोघानमधुन नेमका कोणता पर्याय निवडावा हा प्रश्न आसतो । आश्या वेळी प्रत्यक्ष निर्णय देन्यापुर्वी कोंणतातरी एक निर्णय , होकरार्र्थी किवा नकारार्र्थी घेवून टाकावा । नंतर फक्त या निर्णयाने आपल्या कृतीवर काय परिणाम होतो ते बघावे । आपण जर तो निर्णय खरच मनापासून घेतला आसेल तर पश्यातापंची वेगवेगळी रुपे (राग ,मस्सर,आगतिकता ..... ) आपल्याला छळत नही । आणि आपण 'नो रिग्रेट्स' या स्टेट मधे आसतो। आणि आपण घेतलेला निर्णय योग्य आहे याचे हे प्रतिक आसते ।