मंगळवार, २६ मे, २००९

बर्थ ऑफ़ आर्वतन..

त्याचे दुख काय बरे असावे याचा विचार जेव्हा मी केला तेव्हा मला जे विचार आले त्याचे प्रतिबिम्ब या कवितेत आपसुकच आले । त्या व्यक्तित मला श्रीकृष्णावर निरपेक्षपने प्रेम करणारी मीराबाई दिसली, जीने खुप दुःख सोसून सुध्दा भगावंतावर्ची आपली श्रधा तसुभरही ढळू दिली नाही । हे प्रेम ,ही निष्ठा हे कमिटमेंट सर्व काही अनाकलनियच होते । ही कविता म्हनजे मिराबाईचे विचारच आर्वतनाच्या रुपाने माडण्याचा एक प्रयत्न होता । ही कविता आनेकाना आपले दुख असावे आसे वटन्याचे कारन म्हणजे यात आसलेली आर्जव असावी असे मला वाटते । मात्र या कवितेत दुःखाबरोबच एक आशावादही आहे । पुन्हा परत जन्मंण्याचा आणि त्याहीपेक्षा मोठा विचार म्हनजे समर्पनाचा ....

शनिवार, २ मे, २००९

निरूपण -आर्वतन

माझ्या आवर्तन या कविते विषयी मला वाचकांच्या प्रतिक्रया मिळाल्या। खुप वाचकाना ही कविता म्हणजे ब्रेक अप थॉट वाटला॥ सेलिब्रेशन ऑफ़ ज़ाँय मधे एवढे दुख का , आसेही काहिना वाटले त्याचासाठी हे निरूपण ।


ह्या कवितेचा जन्म झाला तो एका दुखातुनच। पुण्याला जंगली महाराजांच्या मंदिरात मला ही कविता सुचली । एक दिवस संध्याकाळी मी जंगली महाराजानच्या मंदिरात बसलो होतो । तेव्हा कुणीतरी एक भक्त मंदिरात आला । बाहेरुनच त्याने हात जोडले आणि तो रडायला लागला । तसाच रडत तो मंदिरात गेला आणि महाराजांच्या समाधीवर डोके ठेवून आपल्या आश्रुना त्याने वाट मोकळी करून दिली । थोड्या वेळानंतर तो आला तेव्हा तो खुप शांत होता। आगदी शांत समुद्रासारखा ....त्याला आसे कोणते दुख होते ज्याने तो इतका धाय मोकलून रडला आसवा याचा विचार करायला जेव्हा मी सुरवात केली तेव्हा त्याचे जे उत्तर मला मिळाले ते म्हणजे ही कविता...